विकासपुरुष लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कामगार व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा : विकासपुरुष लोकनेते आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुलभाताई गुरुदास पिपरे यांच्याकडून नगराध्यक्ष नगरपंचायत पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने नगरपंचायतीतील सफाई कामगार तसेच पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. समाजासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष हरीश ढवस, नगराध्यक्षा सुलभा गुरुदास पिपरे, सभापती दर्शन गोरंटीवार, संजय कोडापे, श्वेता वनकर, ईश्वर नैताम, गुरुदास पिपरे, महेश रणदिवे, मोहन चलाख, रोहिणी ढोले, उषा गोरंटीवार, आकाशी गेडाम, नंदा कोटरंगे, शारदा गुरनुले तसेच विकास दिवसे उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सफाई कामगार व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या. शहराची स्वच्छता व नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी हे कर्मचारी कोणत्याही परिस्थितीत निष्ठेने कार्य करतात. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना ब्लँकेट व बेडशीट अशा भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी नगराध्यक्षा सुलभा गुरुदास पिपरे यांच्या हस्ते नगरपंचायतीतील सफाई कामगार व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.



