ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाळा आहे, विद्यार्थी आहेत; पण शिक्षकच नाहीत

कान्हळगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 कोरपणा तालुक्यातील कान्हळगाव जिल्हा परिषद शाळेत दहावीचे विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी आवश्यक शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे. शिक्षकांच्या अभावामुळे नियमित अध्यापन होत नसल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दहावी हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष असून, अशा वेळी विषयनिहाय शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहत असल्याची खंत पालकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक नागरिकांनी शिक्षण विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रिक्त शिक्षक पदे भरावीत, तसेच विद्यार्थ्यांना नियमित व दर्जेदार शिक्षण मिळेल यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

शिक्षणाचा मूलभूत हक्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालाच पाहिजे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कान्हळगाव जिल्हा परिषद शाळेत आवश्यक शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये