ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळाची रखडलेली भरती प्रक्रिया सुरू

कामगार मत्र्यांकडे केली होती मागणी, सुरक्षा रक्षक व दोन निरीक्षक पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :- जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची अनेक दिवसांपासून रखडलेली भरती प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे.  सुरक्षा मंडळाने समुचय्य तयार करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

           आमदार किशोर जोरगेवार यांनी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना पत्र पाठवून चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळातील भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच पावसाळी अधिवेशनातही आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर प्रश्न उपस्थित केला होता. जिल्ह्यातील पात्र व बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही भरती लवकरात लवकर सुरू करावी तसेच मंडळातील रिक्त असलेली निरीक्षक पदे तातडीने भरावीत अशी मागणी त्यांनी केली होती.

             या मागणीची दखल घेत चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने सुरक्षा रक्षक पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून. भरतीसाठी आवश्यक पात्रता, शारीरिक चाचणी, कागदपत्रे आणि अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जाहिरातीत नमूद करण्यात आली आहे.

           आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, जिल्ह्यातील युवकांना स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आपले प्राधान्य असून या भरतीमुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच भविष्यातही जिल्ह्यातील रोजगारनिर्मिती आणि रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला जाईल. असे ते म्हणाले आहे.

          या भरती प्रक्रियेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडो युवकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार असून आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रभावी पाठपुराव्याला मिळालेले हे आणखी एक महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये