30 जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा ; नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
30 जुलै रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सखल भागातील नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. नदी, नाले, ओढे आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळावे. पावसादरम्यान वीज पडण्याचा धोका असल्याने झाडाखाली उभे राहू नये तसेच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वाहनचालकांनीही काळजीपूर्वक वाहन चालवावे आणि पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा.
प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचना आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



