ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजात २३ वर्षीय युवकाचा गळफास घेऊन मृत्यू

पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : शहरातील जुना जालना रोड परिसरात २३ वर्षीय युवकाचा गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, युवकाने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

मृत युवकाचे नाव योगेश्वर अभय जाधव (वय २३) असे आहे. तो मूळचा पोपळ शिवणी, ता. सिंदखेड राजा येथील रहिवासी असून, सध्या देऊळगाव राजा शहरातील जुना जालना रोड परिसरात काकड हॉस्पिटलच्या वरच्या भागात आपल्या कुटुंबासोबत राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता योगेश्वर हा त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे फिर्यादीने दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आवश्यक कार्यवाही केली. याप्रकरणी मृताचे वडील अभय मोतीराम जाधव (वय ५२, व्यवसाय शेती, रा. पोपळ शिवणी, ता. सिंदखेड राजा, हल्ली मुक्काम जुना जालना रोड, देऊळगाव राजा) यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

या प्रकरणी कायमी मर्ग क्रमांक ३६/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अन्वये नोंद करण्यात आली आहे. मर्ग दाखल करण्याची कार्यवाही मसफौ जाधव (ब.नं. ८३१) यांनी केली.

घटनेचा पुढील तपास सफौ गिते (ब.नं. १०६०) हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने करीत आहेत. योगेश्वरच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये