ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मच्छिंद्र मच्छुआँ सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण आमसभा १७ सप्टेंबरला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

 भद्रावती :_ मच्छिंद्र मच्छुआँ सहकारी संस्था मर्यादित, भद्रावतीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा गुरुवार, दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्री बालाजी सभागृह, भद्रावती येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या सर्व सभासदांनी सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष दिलीप किसनराव मांढरे यांनी केले आहे.

या आमसभेत दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आमसभेसाठी सभा अध्यक्षांची निवड करणे, मागील सन २०२४-२५ चा आढावा अध्यक्षांमार्फत सादर करणे, तसेच सन २०२५-२६ च्या जमा-खर्च, नफा-तोटा, व्यापार पत्रक व ताळेबंद पत्रकाचे वाचन करण्यात येणार आहे.

याशिवाय सन २०२५-२६ च्या लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करून ऑडिट दोष दुरुस्तीस मंजुरी देणे, १०० रुपयांचे हिस्से पूर्ण न केलेल्या सभासदांची हिस्सा रक्कम व भागभांडवल संस्थेच्या बचत फंडात समाविष्ट करण्याबाबत चर्चा करून संबंधित सभासदत्व कायमचे बंद करण्याबाबत निर्णय घेणे, कार्यालयातील रिक्त सचिव पदाच्या नियुक्तीस मंजुरी घेणे आदी विषयांवर चर्चा होणार आहे.

संस्थेच्या मत्स्यबीज कमिशन व त्यावरील दंड तसेच चोरीची मासेमारी करणाऱ्या सभासदांकडील दंड वसूल न झाल्याने संबंधित सभासदांचे सभासदत्व कायमचे बंद करण्याबाबतही सभेत चर्चा होणार आहे. सन २०२६-२७ साठी लेखापरीक्षकांची निवड करणे, तसेच सभा अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

सभेस संस्थेचे अध्यक्ष दिलीप किसनराव मांढरे, उपाध्यक्ष शंकर बंडुजी कामतवार व संचालक सुधाकर पैकाजी मांढरे यांनी सभासदांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये