कोरपणा येथे श्री संत जगनाडे महाराज व विठ्ठल रुक्माई गुरुपौर्णिमा निमित्त महाप्रसाद उत्साहात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त कोरपणा येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री संत जगनाडे महाराज यांच्या पवित्र कथेचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त आयोजित महाप्रसाद सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व आरतीने झाली. त्यानंतर कथाकारांनी श्री मसे महाराज यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्य, व विठ्ठल रुक्माई यांची समाजप्रबोधन, भक्ती आणि संत परंपरेतील योगदानावर प्रभावी निरूपण केले. कथा, भजन, कीर्तन आणि नामस्मरणामुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
कथेनंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कोरपणा तसेच परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती, ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ तसेच सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक सोहळ्यामुळे कोरपणा शहरात भक्ती, श्रद्धा, सामाजिक ऐक्य आणि अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले.



