ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा येरगव्हाण येथून कु.सुष्टी कवडु गाताडे याच्या प्रथम क्रमांक मिळवुन दमदार कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना :_ पंचायत समिती, कोरपना यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा कायम राखत चंद्रपूर जिल्ह्यात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता चौथी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या पात्रता टक्केवारीत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा येरगव्हाण येथून सृष्टी कवडु गाताडे हिने प्रथम . क्रमांक मिळवल्याबददल मुख्याध्यापक कन्नाके सर व सहशिक्षक कांबळे सर यांनी व व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे ६० टक्क्यांसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येरगव्हाण येथून पहिला क्रमांक घेतलेला आहे क्रमांक पटकावून पंचायत समिती कोरपना यांनी जिल्ह्यात आपला ठसा उमटविला आहे.

या यशामागे पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचे सातत्यपूर्ण परिश्रम, नियोजनबद्ध अध्यापन आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्य महत्त्वाचे ठरले आहे.

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी तसेच स्पर्धात्मक परीक्षांबाबत आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हे यश शक्य झाले.

या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कोरपना यांनी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, पालक तसेच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करत भविष्यातही अशीच गुणवत्तापूर्ण परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.

‘शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश केवळ निकालापुरते मर्यादित नसून, पंचायत समिती कोरपना अंतर्गत सुरू असलेल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे हे फलित आहे. भविष्यातही प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धात्मक परीक्षांसाठी सक्षम बनविणे, शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावणे आणि कोरपना तालुक्याला राज्यस्तरावरही मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’

— कल्याण जोगदंड, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, कोरपना

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये