भारतीय जनता पार्टीच्या कोरपणा शहर उपाध्यक्षपदी उमेश पालीवार यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
दिनांक 27 जुलै भारतीय जनता पार्टी सेवा केंद्र कोरपणा येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव दादा भोंगळे संघटनात्मक बळकटीकरणाच्या दृष्टीने पक्षाने कोरपणा शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून, त्यामध्ये श्री. उमेश पालीवार यांची कोरपणा शहर उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र पक्षाच्या वतीने प्रधान करण्यात आले
श्री. पालीवार हे पक्षाचे सक्रिय व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी, जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत राहतील, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. उमेश पालीवार यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. पालीवार यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, पक्षाची संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि कोरपणा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्ण प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला



