सदर प्रकरणात कारावासाची शिक्षा व ३०,०००/- रु दंड व दंड न भरल्यास ६ महिने कारावास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा येथील मा. कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय श्रीमती एम. आर. चव्हाण (हिवराळे) यांनी अप.क्र. ५१७/२० कलम ३२४,५०४,५०६ भादंवि मध्ये आरोपी श्री कृष्णा नामदेवराव शेगोकर वय ५७ वर्ष रा. ज्ञानेश्वर नगर म्हसाळा जि. वर्धा यास खालीलप्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.
शिक्षेचा तपशील :-
१. कलम ३२४ भादंवि मध्ये दोषी ठरविण्यात आले असुन कोर्ट उठेपर्यंत साधा कारावासाची शिक्षा व ३०,०००/- रु दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावासाची शिक्षा.
घटनेचा थोडक्यात तपशील :-
यातील आरोपी व फिर्यादी हे सख्खे भाऊ असुन त्यांची शेती मौजा पुजई शेत शिवारात लागुन आहे. घटना ता. वेळी व स्थळी यातील फिर्यादी नामे श्री विनोद नामदेवराव शेगोकर वय ५१ वर्ष रा. ज्ञानेश्वर नगर म्हसाळा जि. वर्धा हे आपले शेतात काम करीत असतांना यातील आरोपीने त्याचे हातातील काटीने तु कशाला शिवीगाळ करते असे म्हणुन फिर्यादीचे डोक्यावर मारुन जखमी केले वरुन अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पो.स्टे. सेवाग्राम अप.क्र. ५१७/२० कलम ३२४,५०४,५०६ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा तपास सफी सुनिल पाउलझाडे ब.नं १२१२ पो.स्टे. सेवाग्राम यांनी करुन मा. कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार तर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती डि.पी. कोठारी यांनी संपूर्ण कामकाज पाहिले व त्यांना पैरवी अमंलदार पोअं/चंद्रकांत कोहचडे ब.नं १६२२ यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात वेळोवेळी हजर करून मोलाची कामगीरी बजावली आहे. तसेच पो.स्टे ठाणेदार स.पो.नि.श्री. ठाकुर यांनी सुध्दा सदर गुन्ह्यातील साक्षदारांना आरोपी विरूध्द प्रभावी साक्ष देणेकरीता वेळोवेळी ब्रिफींग करून योग्य मार्गदशन केले आहे. मा. कोर्ट विद्यमान प्रथम श्रेणी न्यायालय श्रीमती एम. आर. चव्हाण (हिवराळे) यावरून गुन्ह्यातील आरोपी यास कलम ३२४ भादंवि मध्ये दोषी ठरविण्यात आले असून कोर्ट उठेपर्यंत साधा कारावासाची शिक्षा व ३०,०००/- रु दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे.
(विनोद चौधरी)
पोलीस निरीक्षक, स्था.गु. शाखा वर्धा



