ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पत्नीच्या खूनप्रकरणी आरोपीला ५ वर्षे सश्रम कारावास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : पत्नीचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याप्रकरणी आरोपी गजानन मारोती ठाकरे (वय ५०, रा. मालेगाव, ता. केळापूर, जि. यवतमाळ) याला हिंगणघाट येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवत ५ वर्षे सश्रम कारावास व ₹२५,००० दंड अशी शिक्षा सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पत्नीसोबत वर्धा शहरातील जैन मंदिराजवळील परिसरात वास्तव्यास होता. दारूच्या व्यसनातून झालेल्या कौटुंबिक वादातून आरोपीने पत्नीवर लाकडी दांडक्याने वार केले. गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास नांदेडे यांनी केला. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. दीपक बहेकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि इतर पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी हिंगणघाट यांनी आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास, ₹२५,००० दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगण्याची शिक्षा सुनावली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये