रोषणाईने उजळले बोर धरण, पण मूलभूत सुविधा चा अभाव प्रसाधान गृहा साठी पर्यटकांची भटकंती..
पालकमंत्री साहेब जरा लक्ष दया अशी स्थानिकांची हाक...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू : तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या बोर धरणावर सोलर लाईट्स सुरू झाल्याने परिसर उजळून निघाला असला, तरी पिण्याच्या पाण्याची व प्रसाधनगृहांची सुविधा नसल्याने पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वर्ध्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते नुकतेच सोलर लाईट्सचे उद्घाटन झाले. मात्र, मूलभूत सुविधांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे.
बोर धरणालगतच बोर व्याघ्र प्रकल्प असल्याने वर्षभर राज्यभरातून हजारो पर्यटक येथे भेट देतात. विशेषतः शनिवार, रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी मोठी गर्दी होते. मात्र, पर्यटकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. महिलांसाठी प्रसाधनगृहांचा अभाव असल्याने महिला व लहान मुलांची मोठी गैरसोय होत आहे.
पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे आणि बाल उद्यान उभारण्याची मागणी स्थानिक नागरिक व पर्यटकांकडून अनेक महिन्यांपासून होत आहे. तहसीलदारांनी याबाबत सात ते आठ महिन्यांपूर्वी आश्वासन दिले होते.
मात्र, आजपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे संबंधित प्रस्ताव लालफितीत अडकला की काय,
पिण्याच्या पाण्याची व प्रसाधनगृहांची वानवाः आर्यदलांचा परा इशारा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एकीकडे पर्यटन वाढविण्यासाठी रोषणाईसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, तर दुसरीकडे अत्यावश्यक सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटकांचा संताप वाढत आहे. रोषणाईपेक्षा पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे अधिक महत्त्वाची आहेत, अशी भावना पर्यटकांनी व्यक्त केली.
शासन व प्रशासनाने तातडीने पिण्याच्या पाण्याची सुविधा, महिलांसाठी प्रसाधनगृहे आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त पर्यटकांनी दिला आहे.



