सोनम वांगचूंग यांच्या समर्थनार्थ ब्रह्मपुरी येथे विद्यार्थी पालकांचा हुंकार!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- नीट पेपर फुटी प्रकरणी हतबल झाल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. या मागणीसाठी गेल्या वीस दिवसापासून जागतिक कीर्तीचे संशोधक, विचारवंत, पर्यावरणवादी सोनम वांगुचक हे गेल्या 20 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले होते. मात्र दिनांक 18 तारखेला सरकारने कोणती सूचना न देता , कोणतीही चर्चा न करता साध्या गणवेशात पोलिसांना पाठवून पोलिसांनी बळजबरीने आणि धक्काबुकी करून सोनम वांगचुक यांना बळजबरीने उचलून नेले हे संविधान विरोधी आहे . सोनम वांगचुक यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी,न्यायासाठी आणि भविष्यासाठी जे आंदोलन उभे केले त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ब्रह्मपुरी येथे सर्वपक्षीय तसेच पालक, विद्यार्थी यांच्या वतीने आक्रोश मार्च त्याचबरोबर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.
सर्वप्रथम ब्रह्मपुरी येथील हुतात्मा स्मारक येथून हजारोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सरकार विरोधात तीव्र घोषना देत आक्रोश मार्च सम्राट अशोक चौक , बाजार चौक, मर्दानी चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक आगेकूच करीत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत होऊन विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले . त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने माननीय महामहीम यांना तहसीलदार मार्फत मागण्याची निवेदन देण्यात आले . त्यानंतर ब्रम्हपुरीतील पालकांच्या वतीने तसेच सर्वपक्षीय व विविध संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले.
यामध्ये सरकारच्या शैक्षणिक धोरणावर टीका करून धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यावा या मागणीसह मोर्च्याचे संयोजक प्रशांत डांगे, विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विनोद झोडगे निमंत्रक,प्रशांत डांगे निमंत्रक,डॉ.राजेश कांबळे, योगेश मिसार नगराध्यक्ष, भूषण रामटेके, गौरव भेंडारकर, राकेश पडोळे,भाऊराव राऊत, जीवन बांगडे,प्रमोद चिमूरकर अविनाश राऊत, मोंटू पिलारे, अनुकूल शेंडे, खेमराज तिडके,प्रेमलाल मेश्राम, नंदा फुले,संजय वाळके,यांनी धरणे आंदोलनात आपल्या भावना व्यक्त करत सरकारवर रोष व्यक्त केला त्यानंतर माननीय महामहीम यांना उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या वतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाकरिता. सुरज मेश्राम, आदित्य बोरकर,सुमित वालदे, राहुल सोनटक्के,पद्माकर रामटेके स्वप्निल राऊत, सुरज तलमले, रवी चहांदे, मामाजी वजाडे, सचिन राऊत, राहुल भोयर, अँड आशिष गोंडाने,सुकेसनी बनसोड,प्रभू लोखंडे, लिलाधर वंजारी,आदींनी सहकार्य केले.



