ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी गडचांदूरात भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिर

नागरिकांनी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्य राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.देवरावदादा भोंगळे यांचे संकल्पनेतून बुधवार दि. २२ जुलै २०२६ रोजी गडचांदूर येथील स्व.भाऊराव चटप आश्रमशाळेत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये जवळपास सर्वच प्रकारच्या आजारांचे निदान, उपचार व शस्त्रक्रिया निःशुल्कपणे करून देण्यात येणार आहेत. अशी माहिती आयोजक म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आली आहे.

सदर शिबीर सकाळी १० वाजेपासून ते दुपारी ०३ वाजेपर्यंत सुरू राहणार असून याठिकाणी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथील मेडिसीन, नेत्ररोग, सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग कॅन्सर आणि दंत तपासणी यांसारख्या रोगांवरील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार असून याठिकाणी सर्व चाचण्या मोफत करून देण्यात येणार आहे.

त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांनी जवळच्या भाजपा जनसंपर्क कार्यालयात जाऊन तसेच नजिकच्या भाजपा पदाधिकाऱ्यांकडे आपल्या नावाची नोंद करावी आणि शिबिरात येताना आधारकार्ड व केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड सोबत आणावे, असेही आवाहन मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा मा. आ. श्री.देवरावदादा भोंगळे यांचे भाजपा जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये