देऊळगाव राजा येथील श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या प्रशासकीय महापूजेची शासकीय नोंद घेण्यात यावी
जिल्हाधिकारी यांना भेटून केली मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रीसंत नरहरिनाथमहाराज संस्थान श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे मागील चार वर्षांपासून आषाढी एकादशीच्या पर्वकाळी माननीय तहसीलदार देऊळगावराजा यांच्या शुभहस्ते संपन्न होणाऱ्या प्रशासकीय महापूजेची शासकीय नोंद व्हावी याकरिता 20 जुलै रोजी श्रीसंत नरहरिनाथमहाराज सेवा प्रतिष्ठानच्या सदस्यांसमवेत माननीय जिल्हाधिकारी श्री.डॉ. प्रविणजी देवरे यांची भेट घेऊन सुरू असणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती देत निवेदन दिले व संस्थानच्या वतीने तुलसीवृक्ष देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी श्री उद्बोध मोहननाथ महाराज पैठणकर,श्री.पंडितराव पाथरकर, श्री.गोपाल व्यास, श्री.सन्मती जैन, श्री.प्रकाश अहिरे, हे उपस्थित होते.
याप्रसंगी दिनांक ११ फेब्रुवारी २०२७ रोजी संपन्न होणाऱ्या पदवीदान समारंभाचेही निमंत्रण देण्यात आले



