श्रीपतभाऊ राठोड यांच्या कार्याचा अकोल्यात झाला सहपरिवार सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वसंतरावजी नाईक अधिकारी-कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा, अकोला यांच्या वतीने ‘वसंत व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली होती ‘वसंतराव नाईकांनंतरचा महाराष्ट्रातील राजकीय प्रवाह’ या विषयावर मा. दिलीप एडतकर, मुख्य संपादक, दै. विदर्भ मतदार, अमरावती यांचे व्याख्यान झाले..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. इंजि. अमर राठोड, संस्थापक अध्यक्ष, वसंतरावजी नाईक अधिकारी-कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य, हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून मा.मोहन राठोड (सेवानिवृत्त माहिती उपसंचालक, पुणे), मा. डॉ. अरविंद आडे (संघटनेचे कोषाध्यक्ष), मा. संदीप राठोड (उपाध्यक्ष) तसेच मा. राजू चव्हाण (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य) यांची उपस्थिती लाभली.
व्याख्यानमालेचे हे पंधरावे वर्ष असून, त्यानिमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा, शासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा, पीएच.डी. प्राप्त गुणवंतांचा, तसेच वर्ष 2024 ते 2026 या कालावधीत उत्कृष्ट साहित्यनिर्मिती करणाऱ्या साहित्यिकांचा आणि संघटनेच्या वाढीसाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या सदस्यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात नागपूर येथील ज्ञानप्रकाश लोकसंस्था चे अध्यक्ष श्रीपतभाऊ राठोड आणि परिवाराने वसंतराव नाईक यांच्या नावाने जमिनीपासून पन्नास फूट उंचीवर कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण परसबाग निर्मितीचा प्रयोग अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या साकारला आहे. लागणारी आवश्यक फळे, हंगामानुसार सर्व प्रकारचा रसायनमुक्त भाजीपाला तसेच विविध हंगामी पिके जैविक पद्धतीने घेऊन त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. कृषी क्षेत्रातील या नाविन्यपूर्ण प्रयोगाची दखल घेऊन संघटनेच्या वतीने संपूर्ण कुटूंबाचा सन्मान करण्यात आला
रविवार, दि. 19 जुलै 2026 रोजी जानोरकर मंगल कार्यालय, रिंग रोड, अकोला येथे हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्राचे सुरेख सुत्रसंचन प्रा.रमेश राठोड आणि प्रा.डि.के.राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.विजय चव्हाण यांनी केले.सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संघटनेचे सरचिटणीस अभ्यासू आणि कार्यप्रवण व्यक्तीमत्व मा. राजूभाऊ चव्हाण यांनी श्रीपतभाऊ राठोड आणि परिवाराच्या कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण व दिशादर्शी प्रयोगाची माहिती प्रस्तुत केली होती.



