वर्धा शहर हद्दीत नाकेबंदी करुन केला 22000/रुपये चा विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त
वर्धा पोलीस स्टेशन शहर दारूबंदी पथकाची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि.19/07/2026 रोजी पोलीस ठाणे वर्धा शहर परीसरात अवैध धंद्यावर कारवाई संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली की, सावंगी मेघे रोड ते बजाज चौक वर्धा पुलिया कडे येणाऱ्या रोड ने एक इसम निळ्या रंगाच्या चेक चा शर्ट घालून असलेला त्याचे हातामध्ये एका मोठ्या कापडी पिशवी मधे विदेशी दारू भरून पायदळ येत आहे.
अशा खात्रीशीर खबरेवरुन पंचासमक्ष पोस्टॉपचे मदतीने रेल्वे स्टेशन वर्धा गेट समोर, स्टेशनफैल वर्धा येथे नाकेबंदी करून त्याचेवर प्रोरेड केला असता, एक ईसम हा त्याचे हातात एक कापडी पिशवी घेऊन असलेला मिळून आला.पंचासमक्ष कापडी पिशवीत एक खाकी रंगाच्या खर्डा च्या खोक्यामध्ये 180 एम एल च्या रॉयल स्टॉग कंपनीच्या विदेशी दारूने भरून असलेल्या 48 नग सीलबंद काचेच्या शिष्या मिळून आल्या. पंचासमक्ष सखोल विचारपुस केली असता, सदरचा विदेशी दारूचा माल हा अतुल मुंगले रा. गजानन नगर, वर्धा याचे मालकीचा आहे व मी तो यवतमाळ येथील वाईन शॉप येथून बसने आणलेला आहे. असे पंचासमक्ष सांगीतल्याने मौक्यावर एकुण जुमला किंमत 22,000/-रूपयेचा मुद्देमाल मिळुन आला. सदरचा विदेशी दारूचा मुद्देमाल जप्त करून पंचनामा कार्यवाही करून नमूद आरोपी 1) सुनील बबनराव झुंजुरकर, वय 58 वर्ष, रा. गजानन नगर, पिपरी मेघे,वर्धा 2)अतुल मुंगले रा.गजानन नगर वर्धा(पसार) यांचे विरुध्द कलम 65 (ई), 77(अ), 83 म.दा.का. अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. सुनिल महाडीक यांचे मार्गदर्षनाखाली ठाणेदार श्री. नागेशकुमार चतरकर पोलीस ठाणे वर्धा शहर यांचे निर्देशाप्रमाणे, दारुबंदी पथक प्रमुख पोलीस हवालदार सुहास चांदोरे सहकारी पोलीस हवालदार सचिन भारशंकर, पोलीस अंमलदार मनोज काकपुरे, पोलीस अंमलदार नवनित वानखेडे, पोलीस अंमलदार उमेश कुंभरे पोलीस ठाणे वर्धा शहर यांनी केली.



