ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“भाजपा शहराधक्ष अरविंद डोहे यांचा” अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : गडचांदूर येथील भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरविंद (अरूण)डोहे,यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन १७ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात करण्यात आले. असा हा सोहळा सामाजिक उपक्रमांनी आणि विविध लोकोपयोगी कार्यक्रमांनी विशेष ठरला.सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी साईशांती नगर व गोपाल नगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.तसेच गरजू नागरिकांना छत्र्यांचे वाटप करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीवही जपण्यात आली.

सायंकाळी आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यात राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव(दादा)भोंगळे यांच्या हस्ते शहरातील विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ,प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन पालकांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.यावेळी आमदार भोंगळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत मेहनत,जिद्द आणि सातत्याच्या बळावर भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.या सोहळ्यास भाजपचे महिला व पुरुष पदाधिकारी,कार्यकर्ते, डोहे मित्र परिवार,पत्रकार बांधव तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमानंतर अरविंद डोहे यांनी उपस्थित सर्व मान्यवर,कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.कार्यक्रमाचे संचालन कोरपना तालुका भाजपचे महामंत्री सतीश उपलेंचवार यांनी केले,तर आभार प्रदर्शन शहर महामंत्री महेश घरोटे यांनी केले.दरम्यान,रात्रीच्या कार्यक्रमात आमदार देवराव भोंगळे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर केलेल्या उत्स्फूर्त नृत्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

           ‘सोहळ्याचे प्रमुख आकर्षण’:

गडचांदूर येथे आयोजित करण्यात आलेला अरविंद डोहे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याने उत्साह,भव्यता आणि जनसहभागाचा नवा विक्रम प्रस्थापित केला.विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी,राजकीय नेते,पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते तसेच हजारो नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला.

        ‘भव्य आयोजन’ :

आकर्षक व देखणे व्यासपीठ,मनमोहक विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट,शिस्तबद्ध नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे सोहळ्याची भव्यता अधिक खुलून दिसली. कार्यक्रमातील प्रत्येक बाब बारकाईने नियोजित करण्यात आल्याने उपस्थितांनी आयोजनाचे मुक्तकंठाने कौतुक केले.

         ‘अविस्मरणीय क्षण’ :

अरविंद डोहे यांच्या सामाजिक,राजकीय आणि जनहिताच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.सत्कार,शुभेच्छा,टाळ्यांचा कडकडाट आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला हा अभिष्टचिंतन सोहळा गडचांदूरच्या सामाजिक व राजकीय इतिहासातील संस्मरणीय क्षण ठरला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये