ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘नर्सरीचे जनक’ वनरक्षक रामदास धोंगडे यांना सेवानिवृत्ती निमित्ताने भावपूर्ण निरोप ; शाल-श्रीफळ देऊन गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिंगणी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सेलू सहवन क्षेत्रातील वनरक्षक रामदास शंकर धोंगडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेलू येथे भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहायक वनसंरक्षक हरिलाल सरोदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला हिंगणी वनपरिक्षेत्र अधिकारी मीनल तुरखेडे, वैशाली भलावी, सेलूचे वनपाल जे. एम. गावंडे, दिनेश उईके, विजय धात्रक, सुनील कोटजावरे, वनरक्षक स्विटी दांडगे, शुभांगी गायकवाड, सपना शेंद्रे, अर्चना मडावी, प्रणाली वनमाली, अंकुश बावणे, गणेश मोहर्ले, गंगाधर मसराम यांच्यासह वन विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रामदास धोंगडे यांनी आपल्या सेवाकाळात वृक्षसंवर्धन आणि नर्सरी विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले. झाडांचे संगोपन आणि वनसंवर्धनातील त्यांच्या योगदानामुळे वन विभागात त्यांची ‘नर्सरीचे जनक’ अशी ओळख निर्माण झाली. सेलू सहवन क्षेत्रातील जयपूर बीट परिसरात त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून आकर्षक ऑक्सिजन पार्क उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

सुमारे १४ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी शेतकरी, नागरिक तसेच वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी जिव्हाळ्याचे आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले. त्यांच्या मनमिळावू, कर्तव्यदक्ष आणि सेवाभावी स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करून गेले. समारोपप्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.*तालुका प्रतिनिधी*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये