20 जुलै रोजी देऊळगाव राजात मातंग समाजाचा विराट जन आक्रोश मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जातीचे आरक्षण उपवर्गीकरणा बाबतीत सर्वोच्च न्यायलायाने निकाल दिला असून अ, ब, क, ड आरक्षण उपवर्गीकरण करणे राज्य सरकार अधिकार आहे. परंतु सर्वोच्च न्यायलयच्या निकाल नंतर देखील अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय राज्यसरकारने आद्यापही घेतला नसून आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करण्यासाठी मातंग समाज बांधव महाराष्ट्रभर ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहे. दि. 20 जुलै रोजी सोमवारी सकल मातंग समाज बांधवाच्या वतीने देऊळगाव राजा बस स्थानक चौकात आपल्या न्याय हक्कासाठी विराट जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.सदर मोर्चा हा देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती येथून निघणार आहे.
या मोर्चासाठी लहूजी शक्ती सेना संस्थापक, अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे,भारतीय वंचित जन संसद अध्यक्ष डाॅ.अंबादास सगट,अण्णाभाऊ साठे क्रांतिसेना अध्यक्ष सचिन भाऊ साठे,क्रांतिगुरु लहूजी साळवे विकास परिषद संस्थापक उत्तमराव कांबळे,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे फोरम संस्थापक विजय अंभोरे साहेब,भाजपा प्रदेश अ.जा.मो.महामंत्री सर्जेराव दादा जाधव, क्रांतीसेना अध्यक्ष राजेश घोडे,DPI प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे,लहूशस्त्र सेनाप्रमुख संजूबाबा गायकवाड,आधुनिक लहूजी सेना संस्थापक नगिनीताई सोमनाथ भाऊ कांबळे,लोकस्वराज्य अंदोलन प्रा.डाॅ.रामचंद्र भरांडे,लसाकम प्रदेशाध्यक्ष प्रा.संजय गायकवाड,लहूजी ब्रिगेड अध्यक्ष डाॅ.अंकुश गोतावळे,लालसेना अध्यक्ष गणपत भिसे हे उपस्थित राहणार असून या मोर्चात मातंग समाज बांधवाचा आवाज राज्य सरकार पर्यंत पोहचविणार आहे. तरी या विराट जन आक्रोश मोर्चाला मातंग समाज बांधव व महिलांनी हजारो संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान देऊळगाव राजा सकल मातंग समाज बांधवाच्या वतीने करण्यात आले आहे.



