ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बेलगाव भु. येथे आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

या इमारतीतून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होईल - आमदार प्रतिभाताई धानोरकर

चांदा ब्लास्ट

भद्रावती तालुक्यातील बेलगाव भु. येथे नव्याने बांधण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सोमवारी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या इमारतीतून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त करीत आपण नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आपण कटिबद्ध असून, मतदार संघातील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार धानोरकर यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरंपच भारती आगलावे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, उपसरपंच जयेंद्र मगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय आसुटकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. शाहीन सय्यद, उपविभागीय अभियंता झाडे, तंमुस अध्यक्ष जोत्स्ना आत्राम, व्यंकेश बदकी, मुख्याध्यापक खाडे, भद्रावती तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत काळे, चंदनखेडाचे सरपंच नयन जांभुळे, सुधीर मुडेवार, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर गाडगे, संध्या बोकडे, वंदना नन्नावरे, तलाठी शिंदे, सुशीला भागवत, सामुदायिक आरोग्य अधिकारी बेबी बोरपे, आशा वर्कर योगीता गंधारे, खोकरीचे सरपंच स्वप्नील पानतावणे, कृउबासचे संचालक प्रवीण बांदूरकर, राजू आसुटकर, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घागी आदी उपस्थित होते.
प्रास्तविक डॉ. संजय आसुटकर यांनी केले. संचालन प्रफुल्ल वाभिटकर यांनी केले. तर आभार किशोर पांढरे यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये