ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो त्याचा एक अंश म्हणून महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. शैलेंद्र देव सर अध्यक्षस्थानी होते मराठी भाषेला महाराष्ट्रात अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून भविष्याच्या दृष्टीने मराठी भाषा टिकणे आवश्यक आहे जी भाषा जास्तीत जास्त लोकांकडून बोलली जाते. ती भाषा त्या प्रदेशापूर्ती जिवंत राहते प्रत्येक देशामध्ये आपल्या भाषेला गौरवाचे स्थान दिले गेले आहे.

मराठी भाषेचा सुद्धा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. असे वक्तव्य कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्यांनी मांडले. प्रा. पवन चटारे यांनी मार्गदर्शन केले प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. अनिस खान , डॉ. संदीप घोडले, डॉ.अजय कुमार शर्मा उपस्थित होते. तसेच शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमासाठी हजर होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. मनोहर बांद्रे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये