ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घूस ग्रामीण रुग्णालयासाठी पदनिर्मितीस शासनाची मंजुरी

आ. जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

चांदा ब्लास्ट

 घुग्घूस येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण होऊनही आवश्यक पदनिर्मिती आणि मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास विलंब होत होता. मात्र चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर घुग्घूस ग्रामीण रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मितीस शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच रुग्णालय कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

   घुग्घूस व परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभारण्यात आली होती. मात्र डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ, लिपिक तसेच इतर आवश्यक कर्मचार्यांची पदे मंजूर नसल्याने रुग्णालय सुरू करता येत नव्हते. परिणामी परिसरातील नागरिकांना उपचारांसाठी चंद्रपूर किंवा इतर शहरांमध्ये जावे लागत होते.

   ही बाब लक्षात घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत बैठका घेतल्या तसेच राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.

  या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेत राज्य शासनाने ग्रामीण रुग्णालयासाठी विविध संवर्गातील पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे. मंजूर पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक तसेच इतर आवश्यक कर्मचार्यांचा समावेश आहे. त्यामुळे रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय प्रक्रिया आता पूर्ण होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये