ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसच्या माजी पंचायत समिती सभापतींच्या मुलाचा शिवसेनेत प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा, प्रतिनिधी : पोंभूर्णा तालुक्यातील घाटकुळ येथील युवा कार्यकर्ते सुशील वामन पावळे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. चंद्रपूर येथील शिवसेना कार्यालयात २४ जून २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बच्चू कडू, आमदार डॉ. मनीषा कायंदे आणि माजी खासदार कृपाल तुमाने यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख कमलेश शुक्ला, विधानसभा प्रमुख विनोद चांदेकर, तालुकाप्रमुख पंकज वडेट्टीवार यांची उपस्थिती होती.

सुशील पावळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकासाभिमुख कार्यावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबाला राजकीय वारसा लाभलेला असून त्यांच्या आई सौ. छबुताई वामन पावळे यांनी २००७ ते २०१२ या कालावधीत चिंतलधाबा पंचायत समिती क्षेत्रातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून येत पंचायत समिती उपसभापती तसेच सभापती म्हणून काम पाहिले आहे.

या पक्षप्रवेशामुळे पोंभूर्णा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हाप्रमुख युवराज धानोरकर यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा समन्वयक भिवराज सोनी, उपजिल्हाप्रमुख अभिजित स्वान, विधानसभा प्रमुख अविनाश उके, ज्येष्ठ शिवसैनिक संतोष दुर्गे, नासिर शेख आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये