ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोयाबीनवरील किड टाळण्यासाठी बीजप्रक्रिया करा _ कृषी अधिकारी डी बी भगत

निमणी येथे सोयाबीन बीजप्रक्रिया मार्गदर्शन कार्यक्रम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना तालुक्यातील निमणी येथे कृषी विभाग कोरपना यांच्या वतीने निमणी येथे खरीप हंगामा अंतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी होत असली तरी कीड, रोगामुळे दरवर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी घट होताना दिसते. हवामान बदल जसा किड, रोगाला कारणीभूत ठरतो.

            याशिवाय बीज प्रक्रिया न केल्यामुळेही सोयाबीनवर किड, रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. हे लक्षात घेऊन पेरणीपुर्वी जर बियाण्यावर गोणपाट ओले करून 100 बियाणे दोन बोटाच्या अंतरावर ठेवून सावकाश गोल रोल करून सावलीत ठेवा.ओलावा टिकवून राहण्यासाठी दिवसातून दोनदा हलके पाणी शिंपडा एकूण १०० पैकी जेवढे दाणे व्यवस्थित उगवतील, तीच तुमच्या बियाणाची उगवण क्षमता असेल.या पद्धतीने बीजप्रक्रिया केल्या तर सोयाबीन वरील येणाऱ्या किड रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल. असे मत सहायक कृषी अधीकारी श्री डी. बी. भगत यांनी व्यक्त केले

       तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियाना अंतर्गत 100 टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे तूर साठी अर्ज करण्याचे आव्हानही केले

             यावेळी सरपंच अतुल धोटे कुकुडसाथ सरपंच शंकर आत्राम महेश बोबडे विलास कोंगरे रंजीत गौरकर देवेंद्र ढवस रत्नाकर पिदुरकर सुधाकर घाटे प्रफुल काळे संतोष गारघाटे प्रफुल मोरे अमर गौरकर आदी शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये