ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवळी पोलीसांकडून मिसिंग, अपहरण प्रकरणात शोध लावण्यात यश.!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस महासंचालक यांचे आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ऑपरेशन शोध मोहीम ४ मध्ये संबंधित पोलीस स्टेशनला दिनांक ८ जून२०२६ ते २२ जून २०२६ पर्यन्त दाखल असलेल्या मिसिंग, अपहरण इत्यादी बाबतचे शोध घेण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्यानुसार देवळी पोलीसांनी आपल्या शोध मार्फत पोलीस स्टेशन अभिलेखावर दाखल असलेल्या सर्व मिसिंग, अपहरणाच्या गुन्ह्याचा आढावा घेऊन तात्काळ आपल्या पथकास सुचना देऊन १९जून २०२६ पर्यन्त मिसिंग क्रमांक १७/२६,२०/२६,,२७/२६, ३१/२६ या मिसिंग असलेल्या मुली शोधण्यात आल्या.त्याचप्रमाणे अपहरण मिसिंग असलेल्या मिसिंग क्रमांक २६/२६, २८/२६ मधील दोन मुलांचा पोलीसांनी कौशल्य वापरून शोध घेतला.अशा प्रकारे पाच मुली व दोन मुले एकूण सात प्रकरणाचा देवळी पोलीसांनी शोध लावून त्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्या पाल्याच्या ताब्यात देण्यात आले.

तसेच देवळी पोलीस स्टेशन येथील २२८/२६ कलम १३७ (२) मधील १८ वर्षा खालील पिढीत मुलीचा शोध घेवून त्यातील आरोपी याला ताब्यात घेवुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.व पिढीतास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला पालकाच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीस स्टेशन नांदगाव खंडेराव जि. अमरावती येथील अपराध क्रमांक ५/२०२६ मधील पिढीत मुलीचा शोध घेवुन आरोपी सहीत पिढीताला ताब्यात घेवुन नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन जि. अमरावती यांचे ताब्यात देण्यात आले.

या प्रकारे देवळी पोलीसांनी कौशल्य प्रणास लावून आपरेशन शोध ४ या शोध मोहीमे दरम्यान ७ मुली व दोन मुले यांचा शोध घेण्यात आला. उर्वरित प्रकरणाचा तपास लवकरच शोध घेवून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणेदार संदीप कापडे यांनी सांगितले.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना खारखेडे यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अश्विन गजभिये पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव, पोलीस कर्मचारी सतिश दरवरे,दुर्गेश बानदे,व इतर पोलीस कर्मचारी यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये