ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऐतिहासिक बुद्ध लेणी येथे आजपासून वर्षावास समापन कार्यक्रम

भदंत सुमनवन्नो महास्थवीर चंद्रपूर , भिक्खु संघवंस स्थविर , भिक्खु आनद स्थविर सह आदी भिक्खुची राहणार उपस्थित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

समापन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान वर्षावास आयोजन समितीचने केले आहे

           आषाढ पौर्णिमा ते अश्विन बिन पौर्णिमा पर्यंत वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २१ जुलै ते १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत करण्यात आले आहे त्या कार्यक्रमाचा समापन कार्यक्रम आज दिनांक ९ ऑक्टोंबर पासून ऐतिहासिक विजासन बुद्ध लेणी येथे वर्षावास आयोजन समितीतर्फे बुद्धविहार येथे करण्यात येणार आहे.

दिनांक ९ ऑक्टोंबर ला होणाऱ्या कार्यक्रमात महापरित्रान पाठ सायंकाळी ९ ते सकाळी सहा पर्यंत अखंड दहा तासाच राहणार आहे. या कार्यक्रमाला भदंत सुमनवन्नो महास्थवीर चंद्रपूर, भिक्खु संघवंस स्थविर, भिक्खु आनद स्थविर सह आदी भिक्खु उपस्थित राहणार आहे.

दिनांक १७ ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता धम्मध्वज वंदन त्यानंतर धम्मर रॅली काढण्यात येणार आहे तसेच कठीण चिवरदान पुण्यत्सव आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या समापन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान वर्षावास आयोजन समितीचे अध्यक्ष लिनता जुनघरे, छाया कांबळे, शिला खाड, शालीनी गोरघाटे . विनयबोदी डोंगरे, जयदेव खाड, सुरज गावंड, प्रियवंद वाघमारे आदींनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये