ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आरोग्य सेवा एकात्मिक पद्धतीने ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहचवा _ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जिवती :_ शासकीय आश्रमशाळा, जीवती येथे आरोग्य विभागाअंतर्गत “सर्वकश प्राथमिक आरोग्य सेवा व प्रशिक्षण “कार्यक्रम दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सदर प्रशिक्षण अंतर्गत प्रतिबंधात्मक, प्रोत्साहनात्मक, उपचारात्मक, पॅलेटिव्ह सेवा एकात्मिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे.कार्यक्रमाचा शुभारंभ मा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्राथमिक आरोग्य सेवांच्या बळकटीकरणासाठी तसेच नागरिकांना दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

यानंतर मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे साहेब यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना आरोग्य विभागाच्या विविध योजना, समुदाय आधारित आरोग्य सेवा, असंसर्गजन्य रोगांचे व्यवस्थापन, माता व बाल आरोग्य, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवा तसेच आरोग्य व कल्याण केंद्रांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रशिक्षणादरम्यान मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रत्यक्ष क्षेत्रीय कामामध्ये प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हास्तर व तालुकास्तरावरील विविध अधिकारी, प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका तसेच इतर आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये विविध तांत्रिक विषयांवर सत्रे, गटचर्चा, प्रात्यक्षिके आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सहभागींचे ज्ञान व कौशल्य वृद्धिंगत करण्यात आले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आरोग्य विभागाच्या समन्वयातून करण्यात आले असून उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल टेंभे तर सूत्रसंचालन आरोग्य सेविका रूपाली माटे तसेच आभार प्रदर्शन श्री कैलास मोहिते यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या करण्यासाठी जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये