ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चोरीस गेलेल्या ११ मोटार सायकल हस्तगत

भद्रावती पोलीसांना यश

चांदा ब्लास्ट

जिल्हयात होत असलेल्या वाहन चोरींच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सा.चंद्रपुर यांनी दिलेल्या निर्देशानुसार व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. वरोरा आयुष नोपानी सा. तसेच पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन भद्रावती बीपीन इंगळे सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोअं. शेशांक बदामवार यांनी गुप्त बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहीतीवरुन गणेश प्रल्हाद आडे वय ३२ वर्ष रा. हनुमान नगर भद्रावती याला ताब्यात घेवुन त्याचेकडुन चंद्रपुर जिल्हा व यवतमाळ जिल्हा येथुन चोरीस गेलेल्या (भद्रावती येथून १, चंद्रपूर शहर येथून ४, रामनगर येथून ३, वणी जि. यवतमाळ येथून ३) अश्या एकूण ११ मोटार सायकल किँमत ४, लाख २५ हजाराचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर, उपविभागीय पोलीस अधिकारी सा. वरोरा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक बिपिन इंगळे पोलीस स्टेशन भद्रावती पोलीस अमलदार शेशांक बदामवार ब.नं. १२४७ पो.स्टे. भद्रावती यांनी केली.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये