ताज्या घडामोडी

वर्धा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रफी कलाकार मंचाद्वारे गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम साजरा

सांवगी मेघे येथिल दत्ता मेघे सभागृहात सादर झाला कार्यक्रम

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

अविनाश नागदेवे वर्धा

स्वर्गीय. मोहम्मद रफी यांना आपल्या मधून निघून गेले या गोष्टीला संपूर्ण 43 वर्ष पूर्ण झालेले आहेत तरी त्यांच्या गाण्याच्या आठवणी आपल्याला जाग्या करतात. यानिमित्ताने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था सांवगी मेघे वर्धा व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कलाकार रफी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोहम्मद रफी यादे सदाबहार गाण्याच्या यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गायनाच्या लाइव्ह कार्यक्रम दत्ता मेघे सभागृह सांवगी मेघे वर्धा येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ अभ्युदय मेघे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार वर्धा रमेश कोळपे, हिंगणघाटचे उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडित यांचे स्वागत पोलिस कर्मचारी यांनी केलेले असून यानंतर कौन है जो सपनो मे आया या गाण्यापासून सुरुवात करण्यात आली व कर चले हम फिदा जान वतन साथियो या गाण्यानंतर कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली आहे.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद कुरेशी यांनी केलेले आहे कार्यक्रमा मध्ये पोलिस अधिकारी विजय महेशगौरी मनोज ओरके आणि पोलिस कर्मचारी भुषण सावरकर रितेश गुजर किशोर शेन्द्रे थेंबसिंग कोहचळे अनिल जाधव किशोर पाटील अश्विन सुखदेवे अनिता ढोबळे योगिता मसराम (झाडे) म्युझिकल बॅन्ड रवि ढोबळे यांचा समावेश करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम घेण्याच्या मागचे कारण असे की कर्मचारी गण आपल्या कामामध्ये इतके व्यस्त असतात की आपल्या परिवारातील सदस्याकडे दुर्लक्ष होत असते करीता आपल्यावर असलेल्या ताणतणाव कमी करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये