ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नगरपरिषद क्षेत्रात रात्री वेळेस मोकाट जनावरचा सूळसुळाट!
अपघाताची शक्यता, सदर बाबीला जबाबदार कोण?
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे
नागभीड नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या परिसरात मोकाट जनावरे,डुकरे यांचा हौदास असून रस्त्यावर बसले असतात तर अचानक डुकरे येतात यामुळे अपघात होत आहे. मोकाट जनावरे व डुकरे कोणाच्या मालकीची आहे याचा तपास करून कार्यवाही करावी किंवा त्याचा बंदोबस्त करावा जेणेकरून अपघातपासून सामान्य व्यक्तीला अपघात होण्यापासून परावृत्त होईल याकरिता नगर परिषद प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी.
काल दि. ३० जुलै रोजी भरधाव दुचाकीला जनावरासाची धडक दिली असता किरकोळ जखमी झाल्याचे सांगितले. वेळीचमदत मिळाल्याने दुचाकी स्वार सुखरूप पोहचल्याचे समजते.
नगर परिषद क्षेत्रात राम मंदिर, बसस्थानक, टी पॉईंट, नवंखळा, भिकेश्वर या ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यात बसून असतात त्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.