ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोरधरण तलावातील ठेकेदारांच्या मनमानी विरोधात भव्य मोर्चाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : बहुजन समाज पार्टी (बसपा), वर्धा जिल्हाच्या वतीने बोरधरण तलाव परिसरातील ठेकेदारांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात तसेच येथील मच्छीमारांवर होत असलेल्या अन्याय, मारहाण व शोषणाच्या घटनांविरोधात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मोर्चा मंगळवार, दिनांक 16 जून 2026 रोजी दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे. मच्छीमार समाजाला न्याय मिळवून देणे, त्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे आणि संबंधितांवर योग्य कारवाईची मागणी करणे हा मोर्चाचा प्रमुख उद्देश आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व वर्धा जिल्हा भोंई समाज भाईचारा जिल्हाध्यक्ष श्री. गणेश बावणे, भोंई समाज भाईचारा महिला जिल्हाध्यक्ष सौ. अनिता पारसे आणि वर्धा विधानसभा अध्यक्ष श्री. निखिल भगत हे करणार आहेत.

बहुजन समाज पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, समाजबांधव तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये