ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गहाळ झालेल्या 02 मोबाईलचा सेलू पोलीसांनी लावला शोध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सेलू हद्दीतील गहाळ झालेल्या मोबाईल बाबत प्राप्त तक्रारीचा पाठपुरावा करुन सेलू पोलीसांना 02 मोबाईलचा शोध लावण्यात यश आले असून तक्रारदार 1) योगेश मुडे रा. सेलू यांचा 1 प्लस कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 15,000 रु. 2) भूषण करनाके रा.सेलू,यांचा nothing कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 27,000 रु. असे एकूण 42,000 रु. किमतीचे गहाळ झालेले मोबाईल सेलू पोलीसांनी तक्रारदार यांना परत देण्यात आलेले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पंकज वाघोडे, पोलीस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे, पो.स्टे. सेलू , यांनी केली.



