हिंगणघाट शहरांमध्ये गुन्हेगारांवर 4 महिन्यात 4 मकोकाच्या कार्यवाया
वर्धा पोलिसांना कडून मकोकाचे 13 गुन्हेगार जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
संघटीत गुन्हेगारी करणा-या गुन्हेगारांविरुद्ध कठोर कार्यवाहीचे पोलिस अधीक्षक वर्धा यांचे निर्देश.
कुख्यात टोळी प्रमुख 1) पियुष उर्फ मस्तान राजु मुसळे, वय 27 वर्ष, रा. संत गोमाजी वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा व त्याचे सोबत गुन्हे करणारे त्याचे साथीदार नामे 2) निखील मनोजराव रामनवार, वय 25 वर्ष रा. शास्त्री वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा 3) जय वसंतराव चुटे, वय 21 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा 4) कार्तिक वसंतराव हमद, वय 29 वर्ष रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा 5) पंकज प्रभाकर साठवणे, रा. नागपूर (पसरा) 6) रितीक उर्फ पकोडा प्रकाशराव खांडे, वय 26 वर्ष रा. माता मंदिर वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा यांचे विरुद्ध गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 अंर्तगत कार्यवाही.
सदर संघटीत गुन्हेगारी संघटनेचा टोळी प्रमुख पियुष उर्फ मस्तान राजु मुसळे हा सन 2019 पासुन गुन्हेगारी वृती कडे वळलेला असुन सदर टोळी प्रमुख याने हिंगणघाट शहर व आजुबाजुचे परीसरातील मुलाना आपले टोळीत शामील करून त्यांचे मार्फतीने गुंड गिरी करून सदरचे टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांनी टोळीच्या आर्थिक व इतर फायद्या करीता व दहशत पसरविण्याचे उद्देशाने टोळी तयार केली आहे. टोळी प्रमुख पियुष उर्फ मस्तान राजु मुसळे विरुद्ध एकुण 12 गुन्हे नोंद असून त्यापैकी 05 गुन्हे त्याने त्याचे साथीदार नामे 1) निखील मनोहराव रामनवार, वय 25 वर्ष रा. शास्त्री वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा 2) जय वसंतराव चुटे, वय 22 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा 3) कार्तिक वसंतराव हमद, वय 21 वर्ष रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा 4) पंकज प्रभाकर साठवणे, रा. नागपूर (फरार) 5) रितीक उर्फ पकोडा प्रकाशराव खांडे, वय 26 वर्ष रा. माता मंदिर वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा यांचे सोबत केले आहे. यांनी स्वतःचे व टोळीचे आर्थिक, दहशत व इतर फायदे करीता खंडणी वसुल करणे, साथीदारासह मिळून जबरी चोरी करणे, दारुची वाहतुक करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून शस्त्रासह दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, गणपतीच्या मिरवणुकीत प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करणे, अंमली पदार्थ विक्री करीता सोबत बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धार्मिक भावना दुखावणे, दंगल करणे, शिवीगाळ करणे, शिस्त पाळत नसणे, घरफोडी करणे, चोरी करणे, जुगार अड्डा चालविणे या सारखे गंभीर गुन्हे स्वतःचे व टोळीच्या आर्थिक व इतर फायद्या करीता दहशत पसरविण्याचे उद्देशाने केलेले आहे.टोळी प्रमुख 1) प्रियुष उर्फ मस्तान राजु मुसळे, वय 27 वर्ष, रा. संत गोमाजी वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा व त्याचे सोबत गुन्हे करणारे त्याचे साथीदार नामे 1) निखील मनोहराव रामनवार, वय 25 वर्ष रा. शास्त्री वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा 3) जय वसंतराव चुटे, वय 21 वर्ष रा. संत ज्ञानेश्वर वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा 4) कार्तिक वसंतराव हमद, वय 29 वर्ष रा. संत तुकडोजी वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा (5) पंकज प्रभाकर साठवणे, रा. नागपूर (फरार) 6) रितीक उर्फ पकोडा प्रकाशराव खांडे, वय 26 वर्ष रा. माता मंदिर वॉर्ड, हिंगणघाट जि. वर्धा याचेवर पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे जिल्हा वर्धा अपराध क्रमांक 850/2026 कलम 8 (क), 21 (क), 29 एन.डी.पी.एस. अधिनियम, 1985 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन गुन्हयातील आरोपीतांचे कृत्य हे त्यांनी स्वतःचे व टोळीच्या आर्थिक व इतर फायद्याकरीता टोळी तयार करून केले असल्याने सदर दाखल गुन्हयातील आरोपीतांचा पुर्व इतिहास पाहता त्यांचे विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 चे कलम 3, 3(1) (ii), (2), (4), (5) अन्वये सदर गुन्हयात कलमवाढ करण्यात आली असुन गुन्हयातील आरोपीतांची तुरुगांत रवानगी करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री सुशिल कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट हे करीत आहे. तसेच यापुर्वी 1) संघटीत गुन्हेगारी टोळी प्रमुख ०१) आयुष पुरुषोत्तम वावरे व टोळी सदस्य ०२) आकाश उर्फ डुड्डु पुरूषोत्तम पसुदेकर, ०३) कोहिनुर संजय उके, ०४) सौरभ उर्फ लाल्या राजेश यादव यांचे विरुध्द पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क. 1861/2025 कलम 308 (5), 324(4), 324(6), 189, 351(2), 352, भारतीय न्याय संहिता सहकलम 142 म.पो.का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हेगारांचा पुर्व इतिहास पाहता त्यांचे विरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अंर्तगत कार्यवाही करण्यात आली असुन चारही आरोपीची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे.
2) संघटीत गुन्हेगारी टोळी प्रमुख आसीफ उर्फ मोटया शौकत अली सैय्यद व टोळी सदस्य नौशाद अली शौकत अली सैय्यद यांचे विरूध्द पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क. 327/2026 कलम 308 (5),351(2), 3(5), भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीतांचा पुर्व इतिहास पाहता गुन्हयातील आरोपी विरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अंर्तगत कार्यवाही करण्यात करण्यात आली
3) पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील अपराध क. 558/2026 कलम 118 (1), 115(2), 352, 3(5) भारतीय न्याय संहिता सहकलम 4, 25 भा.ह.का मधील आरोपी अमोल गणेश गेडाम व मंगेश चिंतामण मडावी यांचे विरूध्द पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्र. 558/2026 कलम 118(1), 115(2), 352, 3(5) भारतीय न्याय संहिता सहकलम 4, 25 भा.ह.का अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीतांचा पूर्व इतिहास पाहता गुन्हयातील आरोपी विरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अंर्तगत कार्यवाही करण्यात करण्यात आली असुन आरोपी अमोल गणेश गेडाम याचा शोध घेवुन त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे.अशा प्रकारे वर्धा जिल्हायात संघटीतरित्या टोळी तयार करून गुन्हे करणाऱ्या टोळी यांचे विरूध्द कठोर कार्यवाही होणे गरजेचे असल्याने मागील 04 महिन्यात एकुण 04 महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे. वर्धा जिल्हातील गुन्हे करणार्या गुन्हेंगारांवर अशाच प्रकारची कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे संकेत श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिले. सदरची कार्यवाही श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशीव वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री सुशिल कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, श्री. संतोष ताले, ठाणेदार वर्धा शहर, श्री अनिल राउत ठाणेदार हिंगणघाट पोउपनि सिनुकुमार बानोत, पोउपनि शरद गायकवाड, पोउपनि महेश इटकल, यांनी केली.



