ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा शहरात खुल्लेआम सुरू असलेले जुगाराचे व अवैध दारू धंदे

नागरिकांकडून कारवाईची मागणी होत आहे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : शहरातील आर्वी नाका वडर मोहल्ला व इंदिरा नगर आणि झोपडपट्टी भागात बाबाराव मुळे,राणी यादव, लंगड्या उर्फ सरदार काही व्यक्तींकडून खुल्लेआम जुगाराचे व सट्ट्यांचे तसेच विदेशी व देशी दारूची अवैध विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. याबाबत पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबाराव मुळे, राणी यादव व लंगड्या उर्फ सरदार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून संबंधित भागात जुगार अड्डे चालविले जात असून विदेशी व देशी दारूची विक्रीही सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रकाराची माहिती असूनही पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अवैध धंद्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची अधिकृत बाजू समोर आलेली नसून, पोलिस विभागाकडून चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये