ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रतापराव सरनाईक यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सत्कार

अधिस्विकृतीधारक पत्रकार बस प्रवास सवलत तथा झालेल्या ईतर मागण्यांचे संजय देशमुख यांनी मंत्री महोदयांना दिले स्मरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 राज्य परिवहन मंत्री व अकोला-अमरावती जिल्हा संपर्क मंत्री मा.ना‌.प्रतापराव सरनाईक यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व विदर्भ वैभव मंदिर न्यास मुंबई कडून एक विशेष सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. बॅ.शेषराव वानखेडे,रा.सु.गवई, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे नंतर विदर्भ वैभव मंदिरच्या मुख्य विश्वस्त पदावर मा.ना.प्रतापरावजी सरनाईकसाहेब यांची सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्याबध्दल विदर्भ वैभव मंदिर सभासद आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अधयक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय एम.देशमुख यांनी व्यासपिठावर प्रत्यक्ष व या संस्थेचे जनरल सेक्रेटरी मा.गजाननजी नागे यांनी फोनद्वारे त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्यात.यावेळी संजय एम.देशमुख,यांचेसह पदाधिकारी प्रा.प्रकाश डवले,प्रदिप खाडे,राजेन्द्र देशमुख,पुष्पराज गावंडे,संतोष धरमकर,संदिप देशमुख,पंजाबराव वर अनिल मावळे,मनोहर मोहोड,अनिल भगत,दिलीप नवले,सागर लोडम,श्रीकृष्ण माळी,अमित इंगळे,दिपक शिरसाट,विकास जाधव व अनेक पत्रकार उपस्थित होते.याप्रसंगी संजय देशमुख यांनी अधिस्विकृतीधारक पत्रकार बस सवलत योजनेची सन्मानपूर्वक अंमलबजावणी व यासोबतच त्यांचेकडे झालेल्या ईतर सामाजिक मागण्यांबाबत त्यांना अवगत केले.त्यासंबंधिच्या चर्चेसाठी मुंबईला येण्याचे त्यांनी सुचविले.

   अकोला येथे शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा पदाधिकारी व एस आय.आर प्रक्रिया मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला विशेष प्रमुख अतिथी मा.ना. प्रतापराव सरनाईक व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे मार्गदर्शक पदाधिकारी प्रा.प्रकाश डवले यांची विदर्भ प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली तसे नियुक्तीपत्र यावेळी त्यांना प्रदान करण्यात आले. उपक्रम व संवाद यात्रेत दरम्यान शिवसेनेची ध्येय धोरणे अधिक लोकाभिमुख करण्याचे प्रयत्न त्यांनी केले.

    राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री मा.ना.संजयभाऊ राठोड,आमदार बच्चूभाऊ कडू हे त्यांच्या नियोजित कार्यक्रमांमुळे उपस्थित नव्हते.या भव्य दिव्य सोहळ्यात अकोला लोकसभा संपर्क प्रमुख,माजी आमदार डॉ.राजनजी साळवी,उपनेते गोपिकिशनजी बाजोरिया,युवा सेना सचिव विठ्ठल सरप,महिला संपर्क प्रमुख संजना गवळी,जिल्हा प्रमुख नारायणराव गव्हाणकर,श्रीरंगदादा पिंजरकर,चंद्रशेखर पांडे गुरूजी,प्रा.प्रकाश डवले,अश्विन नवले,उषाताई विरक,रेखाताई राऊत,महानगरप्रमुख राजेश मिश्रा,योगेश अग्रवाल,अनिल मालगे, संजय देशमुख,डॉ.अभिजीत प्रकाश डवले आदित्य ठाकूर,यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी हजारो शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये