ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गिरोली खुर्द फाट्यावर दुचाकीची पादचाऱ्याला पाठीमागून जोरदार धडक; पिंपळनेरचे प्रभू गडकरी जखमी

भरधाव दुचाकीचा कहर! निष्काळजीपणे वाहन चालवून ५५ वर्षीय व्यक्तीला केले जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे दुचाकी चालविल्याने झालेल्या अपघातात पिंपळनेर येथील प्रभू तुकाराम गडकरी हे जखमी झाले. सिंदखेड राजा मार्गावरील गिरोली खुर्द फाट्याजवळ ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळनेर येथील प्रभू तुकाराम गडकरी हे आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी पिंपळनेर येथून सिंदखेड राजा मार्गाने जात होते. दरम्यान, गिरोली खुर्द फाट्याजवळ एम.एच. १४ जे.जे. १५४९ क्रमांकाच्या दुचाकीच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविले. यावेळी दुचाकीस्वाराने गडकरी यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात प्रभू गडकरी जखमी झाले.

या घटनेप्रकरणी जखमी प्रभू गडकरी यांच्या पत्नी सौ. संगीता प्रभू गडकरी (वय ५५, रा. पिंपळनेर, ता. देऊळगाव राजा) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून ११ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून ५८ मिनिटांनी दुचाकी चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ व १२५ (अ) अन्वये कायम अपघात गुन्हा क्रमांक ५०२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई (बक्कल क्रमांक १४१) करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे यांनी केली..

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये