संत नागाजी महाराजांच्या विचारांतून समाजाला समता, सद्भावना आणि सेवेची प्रेरणा – आ. किशोर जोरगेवार
इंदिरानगर येथे संत नागाजी महाराज जयंती महोत्सव उत्साहात, आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून केले अभिवादन

चांदा ब्लास्ट
संतांचे विचार हे समाजाला योग्य दिशा देणारे आणि माणुसकीची शिकवण देणारे असतात. संत नागाजी महाराज यांनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून, त्यांनी दिलेली समता, सद्भावना, सेवा आणि समाजहिताची शिकवण आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजाने एकोप्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथे संत नागाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाभीक कल्यान समीतीच्या वतीने आयोजित जयंती महोत्सवाला आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांनी संत नागाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन केले आणि विनम्र अभिवादन केले. उपस्थित समाजबांधवांना जयंती महोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
यावेळी समीतीचे अध्यक्ष शंकराव नक्षिणे, सचिव दिनेश दहिवलकर, प्रेमलाल कडूकर, मनोहर कडूकर, अनिल बडवाईक, मोरेश्वर नागपूरे, ईश्वर लाखडे, रत्नाकर चौधरी, नारायन आसकर आदिंची प्रामख्यतेने उपस्थिती होती.
संत नागाजी महाराज यांनी आपल्या विचारांतून समाजाला समता, बंधुता, सद्भावना आणि सेवाभावाचा संदेश दिला. समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागावे, समाजहिताला प्राधान्य द्यावे, ही त्यांची शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत आजही समाजबांधव विविध सामाजिक उपक्रमांतून आपले योगदान देत आहेत. संतांचे विचार केवळ जयंती उत्सवापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या आचरणात आणणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
या जयंती महोत्सवाला मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती. भक्तिभाव, उत्साह आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात हा महोत्सव साजरा करण्यात आला.


