पोलीस स्टेशन सेलूचे नवे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी स्वीकारला पदभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सेलू येथील ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी सावंगी मेघे येथून आलेले पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे यांनी सेलू पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे.
यावेळी सेलू पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सेलू तालुक्यातील समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पंकज वाघोडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. त्यांच्या नियुक्तीमुळे सेलू तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी उपस्थितांनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
— प्रतिनिधी सेलू तालुका. शंकर पानबुडे



