वीर बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमेला अभिवादन करून भावपुर्ण आदरांजली
वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला नरेश कुंबरे दिलीप कुडमिते शुभम मसराम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. ९ जून २०२६ रोजी आदिवासी समाजाचे जननायक, महान क्रांतिकारकारी व आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या क्रांतिकारक वीर बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राणी दुर्गावती नगर, गोंड मोहल्ला, वर्धा येथे आदिवासी समाज बांधवांच्या वतीने वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला समाज सेवक नरेश कुंबरे दिलीप कुडमिते शुभम मसराम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यानंतर मनोज सिडाम गोविंदा आडे राहूल कोहचडे नवीन टिकाम निलेश मसराम गोलू आत्राम सोनू कोडापे बबलू आडे अमीर आत्राम यांनी सुद्धा फोटोला मालाअर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली आणि अभिवादन करण्यात आले यावेळी राणी दुर्गावती नगर परिसरातील तसेच टिंबर लाईन यांनी सुद्धा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली उपस्थितांनी त्यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा गौरव करत समाजातील लोकांना दिलेल्या योगदानाबद्दल स्मरण करण्यात आले आहे.
कार्यक्रमातून समाजातील एकतेचा संदेश देत महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प सुध्दा करण्यात आला आहे या प्रसंगी परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी समाजाचे बंधु बांधव आणि बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते…..



