ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना महानिर्मितीच्या सेवेत सामावून घ्यावे – हंसराज अहीर

अहीर यांची महाजेनकोच्या व्यवस्थापकीय संचालकांशी सकारात्मक चर्चा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : महाऔष्णिक विद्युत केंद्राशी संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित न्याय मागण्यांच्या संदर्भात पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पूर्व अध्यक्ष हंसराज अहीर यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी.एस. राधाकृष्णन यांच्याशी सखोल चर्चा केली.

            चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या हिराई अतिथीगृहात दि. 05 जून 2026 रोजी पार पडलेल्या बैठकीमध्ये सीएसटीपीएसचे मुख्य अभियंता काटोये तसेच अतिरिक्त मुख्य अभियंता बनकर प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीमध्ये हंसराज अहीर यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अखत्यारित या प्रकल्पग्रस्तांच्या जमीनी संपादीत करण्यात आल्या असल्या तरी कालांतराने मंडळाचे निर्मिती, वितरण व पारेषण अशा विभागात विभाजन झाल्याने या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींना वरील तिन्ही विभागात नोकरीकरिता आवेदन करण्याची मुभा देण्यात यावी.

            चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून प्रकल्पग्रस्त अनेक वर्शांपासून मानधन तत्वावर कार्यरत आहेत. अषा प्रकल्पग्रस्तांना सेवेत तीन वर्ष झाल्यानंतर त्यांना स्थायी स्वरूपात प्रगत कुशल कर्मचारी म्हणून महानिर्मितीमध्ये सामावून घेतले जावे अशी सुचनाही अहीर यांनी व्यवस्थापकीय संचालकांशी झालेल्या चर्चेत केली.

            या प्रगत कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनातून कर्मचारी राज्य विमा महामंडळाचा इएसआयसी तसेच भविष्य निर्वाह निधीचा भत्ता मानधनातून कपात होत नसल्याच्या तक्रारी या कुशल प्रशिक्षणार्थींनी केल्या असल्याने त्यांच्या भविष्यकालीन सुरक्षिततेकरिता अशी कपात करण्याबाबत महाजेनकोने धोरणात्मक निर्णय घ्यावा असेही अहीर यांनी उपस्थित अधिकार्यांना सांगितले.

            या बैठकीमध्ये महानिर्मिती व्यवस्थापकीय संचालकांनी बैठकीत उपस्थित केलेल्या विविध मुद्दयांवर विचारविनिमय करून प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याकरिता सकारात्मक कार्यवाही करण्याबाबत श्री. अहीर यांना आश्वासन दिले. या विषयाला घेऊन अनेकदा महाजेनकोला अवगत करण्यात आले असून विषयाचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने निर्णय घेण्याबाबत संबंधित अधिकार्यांना अहीर यांनी यावेळी सुचना केली.

            या बैठकीला रूपेश देरकर, प्रविण गिलबिले, देवेंद्र मालुसरे, नितीन आवारी, सोमलकर व अन्य प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये