ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना, सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष श्री बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.नारायणराव कोल्हे, गोविंदराव अहिरे हे उपस्थित होते , श्री.घनशाम भंडारे, कैलास गाडगे, सतिश कुळकर्णी, पंडितराव पाथरकर, मधुकर धुळे, प्रकाश अहिरे,बाबुलाल शिवरकर, शांतिलालजी निरफळे, सुर्यभान पंडित, रमेश नरोडे, प्रा.विजयकुमार रायमल,रमेश गवई, अरुण खरात, गोविंद भिकानाथ बोरकर, यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी राज्याभिषेक सोहळ्याचे निमित्ताने विचार मांडले,. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव श्री गोविंद बोरकर यांनी केले.राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये