
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सविस्तर याप्रमाणे आहे की, यातील फिर्यादी हिचे घटनास्थळी राहते घर असून दिनांक 03.06.2026 रोजी 13.00 वा. चे सुमारास यातील फिर्यादी ही राहते घराला कुलूप लावून व्यवसायाचे कामाने एल.आय.सी. ऑफिसमध्ये गेली व 16.00 वा. घरी परत आली. तिला कपाटाचे लॉकर उघडे दिसल्याने पाहणी केली असता लॉकरमध्ये ठेवून असलेला वरील वर्णनाचा एकूण जु. कि. 1,83,700 मुद्देमाल चोरीला गेलेला दिसून आला.
कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादीचे घराचे गल्लीतील दारातून घराचे आत प्रवेश करून कपाटाचे लॉकरमध्ये ठेवून असलेला जप्त माल वर्णन :- 1. सोन्याचे कानातले दोन नग अंदाजे 5 ग्रॅम वजनाचे कि. 35000 रु. 2. सोन्याची जुनी वापरती नथनी 3 नग अंदाजे 4.5 ग्रॅम वजनाचे कि. 30500 रु. 3. सोन्याचे दोन मणी अंदाजे 1 ग्रॅम वजनाचे कि. 7000 रु. 4. सोन्याची नाकातील बेसर अंदाजे 0.5 ग्रॅम वजनाची कि. 3500 रु. 5. दोन जुन्या चांदीच्या पायपट्ट्या अंदाजे 200 ग्रॅम वजनाच्या कि. 28000 रु. 6. सहा जुन्या चांदीच्या पायपट्ट्या कि. अंदाजे 60 ग्रॅम वजनाच्या कि. 8400 रु. 7. चार नग जुन्या चांदीच्या पायपट्ट्या अंदाजे 20 ग्रॅम वजनाच्या कि. 2800 रु. 8. दोन नग जुन्या चांदीच्या पायपट्ट्या अंदाजे 30 ग्रॅम वजनाच्या कि. 4200 रु. 9. जुने वापरते 6 नग चांदीच्या मनगट्या अंदाजे 20 ग्रॅम वजनाच्या कि. 2800 रु. 10. जुने वापरते 5 नग चांदीचे पायातील जोडवे अंदाजे 10 ग्रॅम वजनाचे कि. 1400 र 11. जुने वापरते 1 नग चांदीचे पायातील चाळ अंदाजे 5 ग्रॅम वजनाचे कि. 700 रु.12. नगदी अंदाजे 52800 रु. 13. चोरीचे रकमेतून खरेदी केलेले कपडे कि. 5200 रु. 14. दोन मोबाईल फोन कि. 30000 रु. असा एकूण जु. कि. 2,12,300 रु. चा मुद्देमाल चोरून नेला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.



