चंदनखेडा येथे पार पडली शिक्षणयात्रा
नेचर फाऊंडेशन नागपूर व विठ्ठल हनवते मित्र परिवार चंदनखेडा यांचा संयुक्त उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नेचर फाऊंडेशन नागपूर व विठ्ठलजी हनवते मित्र परिवार चंदनखेडा द्वारा आयोजित एक दिवसीय शिक्षणयात्रा चंदनखेडा येथील गुरुदेव सेवा मंडळ येथे बुधवार दिनांक 3 जुन ला सकाळी 10 वाजता.ला संपन्न झाली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक निलेश नन्नावरे संस्थापक -नेचर फाऊंडेशन,नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते 10 वी 12 वी , नवोदय, एकलव्य शाळेत निवड, NNMS परीक्षा पास,स्काॅलरशिप पास, शासकीय सेवेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव करण्यात आला.
विविध केंद्रीय विद्यापीठे,अभिनव विद्यापीठे मध्ये उच्च शिक्षणाची संधी, महाराष्ट्रातिल विविध विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया मागदर्शन, एकलव्य निवाशी शाळा प्रवेश, इंग्रजी नामांकित शाळा प्रवेश -मोफत शिक्षण.शैक्षणिक विषयावर, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजने विषयी एकलव्य, महत्वपूर्ण मागदर्शन केले.यावेळी माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठलजी हनवते,माजी ग्रामपंचायत सदस्या लताताई नन्नावरे, सुचिता सोनवाने,बार्टी चे समतादुत गणेश हनवते, गुरुदेव सेवा मंडळाचे श्रिराम सोनुले , सुंदरा नन्नावरे, विकास दोहतरे,महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते,प्रणय आगबत्नवार, शौर्य क्रिडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते, शंकर दडमल,सारंग भरडे, देविदास चौखे,शुभम भोस्कर, प्रविण भरडे, राहुल कोसुरकार, मंगेश हनवते, दिलिप ठावरी, शौर्य क्रिडा मंडळाचे अध्यक्ष आशिष हनवते. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी प्रामुख्याने उपस्थित होत्या.



