ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट

 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने बापट नगर येथील गुलमोहर उद्यानात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पर्यावरण संवर्धन, हरित क्षेत्र वाढविणे आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात विविध प्रजातींच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त श्री. अकुनुरी नरेश यांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगून प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक सहभागाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास उपआयुक्त श्री. शेषराव टाले, सहायक आयुक्त श्रीमती शुभांगी सूर्यवंशी, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेत हरित व स्वच्छ चंद्रपूर घडविण्यासाठी योगदान देण्याचा संकल्प केला.

चंद्रपूर महानगरपालिका शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये