वर्धा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता ट्रेनिंग ऑफ ट्रेनर कडुन गोळीबार सरावाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. पोलीस महासंचालक सा. महाराष्ट्र राज्य यांचे आदेशाने राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 01 पुणे येथे दिनांक 11/05/2026 ते 16/05/2026 दरम्यान गोळीबार प्रशिक्षण ट्रेनिंगः ऑफ ट्रेनर सत्र क्र. 06 चे आयोजन करण्यात आले होते. सदर गोळीबार ट्रेनिंग ऑफ ट्रेनर चे प्रशिक्षणाकरिता वर्धा जिल्ह्यातून रा. पो. उपनि. गजानन खंडारे व 09 प्रशिक्षक अंमलदार सदर गोळीबार सराव प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन उत्कृष्ट कौशल्य प्राप्त केले असून त्याच धर्तीवर ट्रेनिंग ऑफ ट्रेनर यांचेकडुन वर्धा जिल्ह्यातील अधिकारी व अंमलदार यांचे प्रतेकी 03 दिवसाचे गोळीबार प्रशिक्षण पोलीस फायरबट तिगाव-आमला जि. वर्धा येथे घेण्यात येत असून आतापर्यंत 03 सत्र पूर्ण झाले असून 150 अधिकारी / अंमलदार यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत तसेच उर्वरित अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण देणे सुरु आहे.
ज्या अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत त्या तीनही सत्रातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या अंमलदार यांना श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा, यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व विशेष बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सदर गोळीबार प्रशिक्षणामुळे अधिकारी व अंमलदार यांच्या गोळीबार क्षमतेचा दर्जा व आत्मविश्वास वाढणल्याचे दिसून येत आहे.
सदर प्रशिक्षणाचा उद्देश महाराष्ट्र पोलीस दलातील विविध पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुरक्षीत शस्त्र हाताळणी व गोळीबाराचे उत्तम प्रशिक्षण दिल्यास दहशतवादी हल्ला, नक्षलवादी हल्ला किंवा अन्य युद्धजन्य परीस्थितीत आपले कर्तव्य चोखपणे व समर्थपणे पार पाडण्यास मदत होईल असा आहे.
सदरचे गोळीबार प्रशिक्षण श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक वर्धा, श्री सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात श्री. मजीद शेख राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय वर्धा यांचे प्रत्यक्ष देखरेखी खाली चालू आहे



