ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हयात नाकेबंदी विशेष मोहीम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे नागरिकांनी पालन करावे या करीता मा. पोलीस अधीक्षक, सौरभ कुमार अग्रवाल साहेब व मा. अपर पोलीस अधीक्षक, सदाशिव वाघमारे साहेब, वर्धा जिल्हा यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक पोलीस विभागतर्फे संपूर्ण वर्धा जिल्हयात नाकेबंदी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या अनुषंगाने दिनांक ०४.०६.२०२६ रोजी वर्धा शहरात मार्शल पेट्रोलींग दरम्यान पोलीस अंमलदार पोहवा/१४९२ चंद्रकांत तपासे, पोशी /१६३ दिलीप कामडी, पोशी /९८३ प्रदीप कोहळे, यांनी नमुद वाहन क्रमांक एम. एच ३२ एपी ३०६४ चे चालक यांला इतवारा चौक येथे चेक केले असता १) विकास एकनाथराव डंभारे वय ६७ वर्ष रा. इंदीरानगर आर्वी नाका वर्धा हा दारूचे नशेत आपले वाहन रोडवर चालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंञण शाखा वर्धा येथे आणुन यांची ब्रिथ अॅनालाईझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केले असता त्यांचे मध्ये ६१८.५ mg% अल्कोहोल प्रमाणत मिळून आले. सदर वाहन चालकावर १८५ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. व २०२६ मध्ये वाहन चालविणाऱ्या चालकाच्या गाडयाचे २१ निलंबन प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच सन २०२६ मध्ये पुर्ण वर्धा जिल्हयाच्या एकुण दारू पिवुन वाहन चालविणाऱ्या चालकानवर १५० केसेस झालेल्या आहे. वर्धा श पेट्रोलींग दरम्यान दारू पिवुन वाहन चालवू नये अशी वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.

तरी सदर वाहन चालकाने वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरिकांना करण्यात येत आहे.

(पोलीस निरीक्षक)जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये