ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी वर्धा जिल्हयातील बिट अंमलदार व पोलीस पाटील यांच्याशी साधला संवाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०४.०६.२०२६ रोजी सकाळी ११.३० ते १३.०० वा दरम्यान श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा. यांनी वर्धा जिल्हयातील सर्व ठाणेदार, बिट अधिकारी, अंमलदार, त्यांचे मदतनीस आणि जिल्हयातील सर्व पोलीस पाटील यांचेशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला असुन बिट अंमलदार व पोलीस पाटील यांचे अधिकार व कर्तव्य या बाबत माहिती दिली. सदर व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये बिट अंमलदार यांनी आपल्या बिट मधील गाव, वस्त्या, प्रमुख व्यक्ती, संवेदनशिल ठिकाणे, धार्मिक ठिकाणे तसेच शाळा-महाविद्यालये या ठिकाणी नियमीत भेटी देणे व गस्त करणे, सराईत गुन्हेगार व संशयीत व्यक्तीवर लक्ष ठेवणे, चोरी, दरोडा, घरफोडी तसेच अंमलीपदार्थ बाबत गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करणे, बिट बुक व इतर रजिस्टर अद्यावत ठेवणे, नागरिकांच्या समस्या ऐकुण त्यांना योग्य मार्गदर्शन करणे याबाबत सुचना दिल्या.

तसेच पोलीस पाटील यांना त्यांचे अधिकार व कर्तव्यबाबत मार्गदर्शन करताना पोलीस पाटील हा गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करणारा महत्वाचा दुवा असे संबोधीत करत गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे. गुन्हे, भांडणे व संशयास्पद हालचाली याबाबत पोलीसांना तात्काळ माहिती देणे. गुन्हेगार, फरार आरोपी किंवा संशयीत व्यक्तीबाबत माहिती देवून सहकार्य करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यास त्याबाबत पोलीसांना माहिती देणे, नैसर्गिक आपत्ती पुर, आग इत्यादी घटणांची माहिती देणे, निवडणूका, सण उत्सव, मिरवणूका व इतर सार्वजनिक कामामध्ये सहकार्य करणे, अनैसर्गिक मृत्यू, बेवारास प्रेत इत्यादी महत्वाच्या घटणांची माहिती देणे, गावामध्ये गुन्हे व सार्वजनिक उपद्रव, जुगार, अवैद्य दारु विक्री या सारख्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी माहिती मिळताच तशी माहिती तात्काळ पोलीसांना देणे याबाबत मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम अन्वये पोलीस पाटील यांचे अधिकार व कर्तव्य यावर मार्गदर्शन केले. व पोलीस पाटील यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या समस्यांचे निराकरण केले.

सदर बिट अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस पाटील यांच्या संवाद मिटींग मध्ये श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा., श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा., सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी तसेच बिट अधिकारी व अंमलदार तसेच वर्धा जिल्हयातील सर्व पोलीस पाटील हे त्यांचे हद्दीतील पोलीस स्टेशन येथे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे हजर होते.

(विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये