ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माणिकगड सिमेंट गडचांदूरतर्फे जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट चे युनिट हेड अतुल कन्सल यांनी पुन्हा एकदा उत्कृष्ठ युनिट प्रमुख याची भूमिका निभवत आज दिनांक 5 जुन रोजी, जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन माणिकगड सिमेंट प्लांट एरियातील गरजू ठिकाणी वृक्षारोपण केलेत.

या वृक्षारोपणात निम व करंजी अशा 200 झाडांचा समावेश असून या सर्व वृक्षारोपणाची देखभाल माणिकगड सिमेंट च्या पर्यावरण विभागाकडून वेळोवेळी करण्यात येईल.

या वेळी माणिकगड सिमेंट चे युनिट हेड अतुल कन्सल, टेकनिकल हेड असित परुई, फायनान्स हेड रोहित गुप्ता, माईन्स हेड संतोष तिवारी व ईर हेड नवीन कौशिक सोबत सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

या प्रसंगी अल्ट्राटेक माणिकगडचे युनिट प्रमुख अतुल कन्सल यांनी सर्व उपस्थिताना वृक्षारोपणाचे महत्व समजवत प्रत्येकाने आपली स्वतःची जिम्मेदारी समजून.. एक पेड मा के नाम… तहत वृक्षारोपण करावेत असे आव्हान केलेत तर माणिकगड कडून आम्ही पर्यावरण वाचवीन्यकारिता वृक्षारोपण करत राहू असे सुद्धा प्रतिपादन केलेत.

या वृक्षारोपनाला यशस्वी करण्याकरिता माणिकगडच्या पर्यावरण विभागाने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये