ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कुजलेल्या अवस्थेतील आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील सिंभोरा धरण परिसरातील ऋषीबाबा मंदिराचे जवळील टिनाच्या शेडच्या बाजुला असलेल्या झाडाझुडपात एक पुरुष जातीचे प्रेत ज्याचे गळ्यापासुन डोक्याचा भाग वेगळा झालेला असुन कुजलेल्या अवस्थेतील अज्ञात पुरुषाचा मृतदेह मिळुन आल्याने त्यावरुन पोलीस स्टेशन आष्टी येथे मर्ग क्र.24/2026 कलम 194 बी.एन.एस.एस. अन्वये अज्ञात / अनेसर्गीक मृत्युची नोंदणी करण्यात आली आहे. सदर अज्ञात मृतदेहाची अद्याप पावेतो ओळख पटलेली नाही. तरी मयत बाबत कोणाला काही माहीती असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

अज्ञात पुरुषाच्या मृतदेहाचे वर्णन-

एक अनोळखी मृत पुरुष अंदाजे वय 40 ते 45 वर्ष उंची-05 फुट 04 इंच अंगात केशरी रंगाचा फुल बाह्याचा टी-शर्ट व काळ्या रंगाचा जिन्स पँन्ट, बेल्टप्रमाणे हिरव्या रंगाची नायलॉन पट्टी पँन्टला बांधुन असलेली दिसत आहे.

तरी शोधपत्रिकेतील नमुद वर्णनाचा मिळता-जुळता पुरुष आपले पो.स्टे. हद्दीत मिसिंग असल्यास किंवा अशा वर्णनाच्या पुरुशाबाबत माहीती मिळुन आल्यास पोलीस स्टेशन आष्टी येथे कळवावे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये